मूकनायक (दौंड )ता:12/23 प्रतिनिधी : विजय बगाडे
अनेक खाजगी संस्था,
जिल्हापरषदा, नगरपालिका, महानरपालिका, सरकारी दवाखाने,
रेल्वे, खाजगी कंपन्या, खाजगी सुरक्षा रक्षक
आणि
इतर ठिकाणी काम करणाऱ्या गोरगरीब कामगारांचा दरमहा पीएफ भरला जात नाही?
संपूर्ण महाराष्ट्रात हा किमान १, २ हजार कोटींचा घोटाळा आहे!
यातील एकट्या कल्याण डोंबिवली महानरपालिकेने १०० कोटी पीएफचे भरलेले नाहीत!
दुसरे उदाहरण देऊळगाव राजा नगरपालिका!
येणाऱ्या काळात ठेकेदारी ही, “आधुनिक भारतातील आधुनिक गुलामगिरी असेल”!
राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, सरकारी दवाखाने आणि सरकारी कार्यालये, याठिकाणी कंत्राटी पद्धत, ठेकेदारी आहे,
त्या, त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे!
गोरगरीब बोलू शकत नाहीत, कर भरणारा मद्यमवर्गीय माणूस झोपला आहे!
– इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या संगनमताने या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला जात नाही!
– या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार हा शक्यतो रोख रकमेत केला जातो!
कंत्राट किंवा ठेका हा नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांच्या नातेवाईकांना, जवळच्या लोकांना दिले जातात किंवा हप्ते तरी वाढवून घेतले जातात!
★ तर याहीपेक्षा भयानक म्हणजे ठेकेदारांनी नियमाप्रमाणे किमान वेतन देणं आवश्यक आहे.
– पण ते दिले जात नाही, करायचे असेल तर कर काम नाही तर निघ अशा धमक्या असतात.
★ नियमाप्रमाणे ठेकेदारांनी सगळ्या कामगारांचे बँक खाती उघडून त्यामध्ये पगार जमा करायचा आहे.
– पण असं केलं जात नाही, बँक खातीच उघडली जात नाहीत, ठेकेदार सरकारला फक्त कामगारांचा आकडा सांगतो, त्या आकड्याप्रमाणे सरकार एक रक्कमी पैसे ठेकेदाराच्या खात्यात जमा करते.
– त्यानंतर ठेकेदार ठरवतो किती पगार द्यायचा ते व त्याप्रमाणे रोख रकमेत दरमहा पगार दिला जातो.
★ नियमाप्रमाणे सर्व कामगारांची बँक खाती ठेकेदाराने उगडल्यावर त्यामध्ये पीएफ, पेन्शन आणि इतर निधी दरमहा जमा करायचा आहे.
– राज्यात सगळ्यांत मोठा हा घोटाळा असून, काही हजार करोडो रुपये ठेकेदारांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ढापले आहेत,
गोरगरीब कामगारांचे पैसेच भरले नाहीत.
समजा, एखाद्या महापालिकेत, 100 कर्मचारी ठेकेदारीने आहेत, तर महिन्याला 3,000 × 100 = 3 लाख निवळ!
असे हे गणित आहे, यातून खालपासून, वरपर्यंत हप्तेखोरी ठरवली जाते! हे सगळे एक छोटंसं उदाहरण आहे.
● आणि यावर सद्या तरी कोणाचेही नियंत्रण नाही पुढेही येईल ही अपेक्षा नाही,
सर्वसामान्य माणूस जागा झाला नाही, जागरूक झाला नाही तर, येणारी पिढी आधुनिक ठेकेदारीची बळी ठरलेली असेल!.
✍✍

