Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती दिनी, सर्व हारा उत्कर्ष...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती दिनी, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेच्या वतिने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रतिनिधी आज 26 जून 2023 राजर्षी शाहू महाराज यांचा 149 वा जयंती मोहोत्सव के .एस. बी. चौक, (भोसरी ते निगडी, राजमार्ग) पिंपरी चिंचवड पुणे येथे साजरा करण्यात आला. यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष, मा. भीमरत्न प्रा. बी. बी. शिंदे व सहकारी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपस्थित समूहाला संबोधित करतांना शिंदे म्हणाले की, पूर्वी ज्या मानसिकतेने रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवराय यांना छळले, त्याच मानसिकतेतून (स्वतःच स्वताला लोकमान्य म्हणून घेणारे) शिवरायांचे वारसदार म्हणून शाहू महाराज यांना टिळक महाशय धेडोंका राजा म्हणत असत. कारण शाहुजी महाराज यांनी समतेचा पुरस्कार करून, विषमतेचा तिरस्कार करून, मनुवादी, वैदिक मानसिकतेला झुगारून दिले होते.
जे जे वैदिकांना नको आहे ते ते शाहू महाराजांनी रयतेच्या, बहुजनांच्या उद्धारासाठी केले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जी शैक्षणिक बुद्धिमत्ता लागणार होती, त्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक परिपक्वतेसाठीची आर्थिक मदत देऊन, या महामानवाला शैक्षणिक उभारदेण्याचे महान, अति मोलाचे सहकार्य केले.
आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असून, खरे बोलणे हा देशद्रोह ठरवला जात आहे. शिवाय हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. जेव्हांपासून देशात संविधानाचा आमल सुरू आहे, तेव्हा पासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच तर आहेत. मग यांना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे ? यांना हिंदुराष्ट्र या नावाने, ब्राह्मण राष्ट्र, मनुस्मृती, जातिभेदावर आधारित असणारे हिंदुराष्ट्र या नावाने, ब्राह्मण राष्ट्र, मनुस्मृती, जातिभेदावर आधारित असणारे राष्ट्र निर्माण करून, भारतीय संविधान बाजूला करावयाचे आहे. हे बहुजनांनी पक्के लक्षात ठेवून त्यांना खऱ्या अर्थाने सतेतून दूर करणे आवश्यक आहे.
त्याकरिता या देशातील सर्व भारतीय नागरिकांनी सम विचारांनी आपले सर्व गट तट, विविध पक्ष, संघटना, विसर्जित करून ,या देशातील बहुजन समाजाला न्याय मिळणे कामी, सर्वांनी या विषमतावादी शत्रूचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी मिळून, एकत्रित लढा लढण्याची काळाची गरज आहे.
हीच खरी या रयतेच्या राजाला मानवंदना ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून, आपणा सर्वांना या दिनी शुभेच्छा व्यक्त करितो असे ते बोलले.
यावेळी या सामाजिक संघटनेचे सचिव मा. लक्ष्मण सिरसाट , सह संघटक मा. रामभाऊ ओव्हाळ, मा. बाळासाहेब जाधव, मा. अशोक जावळे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments