प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्का दायक बातमी समोर येत आहे पशुवैद्यकीय डॉ ने आपल्या पत्नी चा खून करून दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतः सह संपूर्ण कुटुंबच संपवलं दौंड तालुक्यातील वरवंड येथे हृदय हेलावणारी घटना घडली आहे अंगावर काटे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुका च नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. अतुल शिवाजी दिवेकर वय. ४२ , पल्लवी अतुल दिवेकर वय ३९ अधीवत अतुल दिवेकर वय ९ वेदांती अतुल दिवेकर वय ६ अशी मृतांची नावे आहेत दौंड तालुक्यातील वरवांड येथील हे कुटुंब वास्तव्यास होते या बाबत सविस्तर माहिती अशी की वरवंड येथील गंगा सागर पार्क मध्ये घर क्र २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली. डॉ अतुल शिवाजी दिवेकर आणि पल्लवी अतुल दिवेकर यांचे मृत देह लटकलेल्या अवस्थेत घरी अडळले व्यवसायाने डॉ असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नी च गळा दाबला नंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली. आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करून कुटुंब संपवले विहीर खोल असल्याने त्यांचे मृत देह बाहेर काडण्यास अडचण निर्माण होते आहे . पशू वैद्यकीय डॉ अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोले जात आहे .पुढील तपास उपनिरीक्षक संजय नागरगोजे सागर चव्हाण दत्तात्रेय टकले हनुमंत भगत करत आहेत

