प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन सेना युवा आघाडी प्रमुख पदाधिकारी निवडी संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार युवा प्रदेशाध्यक्ष किरणजी घोंगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली यावेळी पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत.
आज दि.१८जुन रोजी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती जिल्हाध्यक्ष अर्जुन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्या.
बैठकीत कोल्हापूर लोकसभा युवा जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे यांची निवड करण्यात आली तर हातकणंगले लोकसभा युवा जिल्हाध्यक्ष प्रा.मिलींद कामत यांची निवड करण्यात आली तसेच कोल्हापूर युवा जिल्हा महासचिव क्रष्णा दावने यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पदाधिकारी यांना पक्ष वाढविण्यासाठी काम करुन सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरणजी घोंगडे साहेब यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून परभणी शहराध्यक्ष निलेश डुमने उपस्थित होते.
बैठक यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव सागर कुरुडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे,करविर तालुका अध्यक्ष बाबासाहेब कामत, जिल्हा संपर्कप्रमुख शुभम कामत, युवा जिल्हा कार्याध्यक्ष पिंटु कांबळे,
महेश कांबळे, राधानगरी तालुका अध्यक्ष संजय कांबळे,सुमीत कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता नलवडे , सौ.संजना कुरुडे आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

