Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी मा...

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी मा प्रशांत (नाना)सातव याची निवड

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य वतीने रिक्षा चालकांच्या समस्या संदर्भात व एकजुटीच्या अनुषंगाने दिनांक १७ व १८ जून २०२३ रोजी कोपरखैरणे, मुंबई येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या अधिवेशनामध्ये बारामती दौंड इंदापूर रिक्षा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष व तडफदार नेतृत्व मा.प्रशांत (नाना )सातव यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.व भावी वाटचाली संदर्भात त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सदरचे नियुक्ती पत्र कामगार नेते व ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट् अध्यक्ष मा. शशांक राव, सरचिटणीस मा.विलास भालेकर यांनी दिले.या निवडी प्रसंगी प्रा. डॉ.भीमराव मोरे यांनी मनापासून समाधान व्यक्त केले व अशीच रिक्षा चालकांप्रती आपली सेवा व कार्य करावे अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बारामती दौंड इंदापूर रिक्षा कृती समितीचे जावेद भाई सय्यद , अण्णासाहेब समिंदर ,किशोर कांबळे,दादासाहेब शिंदे सतीश बहिरट इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments