प्रतिनिधी-(बारामती प्रशांत सोनवणे) शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत ३० मे २०२३ रोजी बारामती शहरात शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात सर्वच विभागांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशा सुचना उपविभागीय अधिकारी श्री. वैभव नावडकर यांनी दिल्या
उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित शासन आपल्या दारी अभियानाची पुर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी तहसीलदार श्री. गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, निवासी नायब तहसीलदार श्री. विलास खरे अदी उपस्थित होते. यावेळी श्री. वैभव नावडकर म्हणाले शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी, एकुन किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे, त्याची निवड यादी सर्व विभागांनी आजच तहसील कार्यालयात सादर करावी. शिबिरात लाभार्थ्यांन कडुन योजनेचा अर्ज भरून घेतले जावेत, विविध प्रकारचे अर्जाचे नमुने उपलब्ध केले जावेत, विविध योजनांची माहिती असणारे स्टॉल्स प्रत्येक विभागाने लावावेत. त्या दृष्टीने प्रत्येक विभागाने तयारी करावी कोणीही लाभार्थी योजनेच्या लाभा पासून वंचित राहणार नाही, याची सर्वच विभागांनी दक्षता घ्यावी. अशा सुचना त्यांनी दिल्या. शासन आपल्या दारी या अभियाना अंतर्गत शिबिरात नागरिकांनी लाभार्थ्यांनी सहभाग घेवून विविध योजनेचा लाभ आणि माहिती घ्यावी. असे आवाहन श्री वैभव नावडकर यांनी केले.

