नागपूर : आज १ मार्च २0२३ या वृतपत्राचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. शंभर वर्षानंतर आज बाबासाहेबांच्या विचारांच्या मुखपात्राचे अनावर झाले.कार्यक्रमांची सुरुवात संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने झाली. प्रास्ताविक मा. तुषार गायकवाड, मुख्य संपादक मुकनायक, यांनी आज मुकनायक याची गरज का आहे? त्यांनी हेही सांगितले की आज टिळकांनी चालु केलेला केशरी आहे मग मुकनायक का नाही? आज किती वृतपत्रात बहुजनांचे प्रश्न मांडले जात आहेत. आज याची किती गरज आहे हे त्यांनी बोलून दाखविले. सोबतच त्यांनी लोकांना हे वृतपत्र घराघरात पोहचविण्याची विनंती केली. प्रा. जावेद पाशा, निवासी संपादक, मुकनायक यांनी आपल्या भाषणात सांगितले की आम्ही राम – राम म्हणण्यास तयार आहोत पण आम्हाला गोवळकरांचा राम नको तर काबीरांचा राम पाहिजे. आम्हाला हिंदू राष्ट्र नाही तर संविधाना द्वारे भारतीय मूल्यांची जोपासना करायची आहे. आर आर एस कसा आपल्या वृतपत्राची मदत घेऊन लोकांची कशी दिशाभूल करीत आहे ते सांगितलं. प्रा. प्रिया मेश्राम,, लेखणी प्रकाशन, लेखिका, यांनी आपल्या भाषणात सावित्री माई यांनी या देशातील मुलींना कसं लिहायला, बोलायला कसं शिकविले हे सांगितलं. हक्काचं मुकनायक आपल्याला का हवं हे बोलून दाखविले.प्रा. रमेश पिसे यांनी सांगितलं की वृतपत्राची ताकत सांगितलं. गोपाळऋषी भारती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबानी कसं मुक्याना कसं बोलत केलं हे स्पष्ट केलं.त्यांनी हिंदू शब्दाची उत्पती कशी झाली हे सांगितलं. आजचे सरकार कसे खोटे आहे, कसे संविधान कसे उपयोगी आहे. हेच सांगितलं. बाबासाहेबांनी जाती मिटवण्यासाठीच संविधान लिहिलं. हा देश फक्त भारत देश आहे ना की हिंदू राष्ट.जर बाबासाहेब यांच्या नावाने सरकारे बनतात तर आमच्या धामण्यात बाबासाहेबांचे रक्त आहे. त्यामुळे या वृतपत्रामुळे आपल्याला या देशाची दिशा आणि दशा बदलवायची आहे.आणि बाबासाहेबांच्या सप्नातील भारत देश घडवायचा आहे.


