सेक्टर नंबर 22 निगडी पुणे येथे रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात व सागर डबरासे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने “लाक्षणिक उपोषण” राजू गायकवाड, अध्यक्ष झोपडपट्टी सेल पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती धुराजी शिंदे – शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, मुकुंद रणदिवे -कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, संदीप रंधवे, पुणे जिल्हा महासचिव दत्ताभाऊ गायकवाड, महासचिव पिं. चि. शहर, ज्येष्ठ नेते भीमराव सुरवसे, रमेश कांबळे संघटक एकनाथ कसबे भोसरी विधानसभा अध्यक्ष, संतोष ससाने भोसरी विधानसभा उपाध्यक्ष, विष्णू बोर्डे प्रसिद्धीप्रमुख, छाया क्षीरसागर संग्राम नगर शाखाध्यक्ष त्यांच्या सहकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष मच्छिंद्र कदम व त्यांचे सहकारी, मनसेचे नगरसेवक सचिन भाऊ चिखले, बसपा शहराध्यक्ष सुशील गवळी, रिपाई आठवले गट लिंबराज कांबळे, विलास गरड, सर्वहारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बीबी शिंदे साहेब व अनेक स्वाभिमानी भीमसैनिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.

