Thursday, February 26, 2026
Homeपुणेवार्ड क्र.25 वाल्हेकरवाडी येथे मनोज तोरडमल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

वार्ड क्र.25 वाल्हेकरवाडी येथे मनोज तोरडमल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं. चिं.)

दि,09 फेब्रुवारी, चिंचवड : वार्ड क्र 25 वाल्हेकरवाडी चिंचवड या ठिकाणी मनोज तोरडमल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, दि 07 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिका चे सत्तारुढ पक्षनेते मा. श्री नामदेव ढाके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मनोज तोरडमल हे गेली दोन दशकांहून अधीक काळ सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असतात. व त्यांचा जनसंपर्क दांडगा व सर्वांना सोबत घेऊन चालणारे त्यांचे वेक्तिमहत्व आहे. हाच त्यांचा चांगला गुण लक्षात घेता, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत नगरसेवक गोपाळ मळेकर,भाजपा अनुसूचित जाती प्रदेश चिटणीस सौ कोमल ताई शिंदे, भाजपा नेते सुधीर वाल्हेकर, आदेश नवले, भाजपा नेते सचिन शिवले, जेष्ठ नेते शिरीष जी कर्णिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय ससाणे व मोठयाने संख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments