Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी बाळासाहेब भालेराव यांची निवड.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी बाळासाहेब भालेराव यांची निवड.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड. ( पिं चिं )

दि,08 फेब्रुवारी पिंपरी चिंचवड : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व त्यागमूर्ती माता रमाई संयुक्त जयंतीनिमित्त पूर्णानगर येथील पक्ष कार्यालयात रविवार दि.06 फेब्रुवारी रोजी, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भालेराव यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर पक्षामध्ये अनेक युवकांनी व महिलांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी पुणे शहराध्यक्ष जयंत चिंचोलीकर, पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजय साळुंखे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष तान्हाजी रंनदिल,चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष रघु गवाळे,भोसरी विधानसभा युवा अध्यक्ष रुपेश कांबळे, महिला पुणे जिल्हा अध्यक्षा माधुरी खोब्रागडे, ज्योती कांबळे महिला अध्यक्षा भोसरी विधानसभा, प्रियंका रावळ महासचिव भोसरी, मनीषा भोसले सचिव भोसरी विधानसभा, किरण साळवे अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण, तोसिफ मुल्ला अध्यक्ष उदयोग आघाडी, प्रा. अशोक धुळधुले अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षक आघाडी इ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश व कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments