Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*जागतिक संगीत विद्यापीठ लंडन व्दारे आयोजित स्पर्धेत राहाता येथील गौरव साळवे प्रथम

*जागतिक संगीत विद्यापीठ लंडन व्दारे आयोजित स्पर्धेत राहाता येथील गौरव साळवे प्रथम

जागतिक संगीत विद्यापीठ ट्रिनिटी लंडन यांनी घेतलेल्या स्पर्धेत राहाता येथील सेंट जोंन्स स्कूलमधील माजी विद्यार्थी गौरव अनिल साळवे याची भारतातून प्रथम क्रमांक देऊन निवड झाली. ट्रेनिटी संगीत विद्यापीठ व्दारे आयोजित स्पर्धा २३ जानेवारी २०२२ रोजी औरंगाबाद येथे घेण्यात आली होती. त्यात प्लेक्ट्रम गिटार प्रकारात गौरवची भारतातून १ ला व जागतिक स्तरावर ७ वा विजेता म्हणून निवड झाली. लंडन विद्यापीठाने गौरवला आदर्श शिक्षक म्हणून निवड तसेच लंडनला येऊन इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवून,विनंती केली आहे. या घवघवीत यशाबद्दल गौरवचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गौरव साळवेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सेंट जोंन्स स्कूलने एक विशेष सत्कार कार्यक्रम ठेवला होता. त्यात शाळेतर्फे मुख्याध्यापक फादर गिलबर्ट व उपमुख्याध्यापक फादर फ्रान्सिस यांनी गौरवला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. फादर फ्रान्सिस यांनी आपल्या भाषणात सांगितले की,गौरवने आपल्या मिळालेल्या साधनांचा पुरेपर वापर करुन जिद्द व मेहनतीने हे अपूर्व यश मिळवले याबद्दल सेंट जोन्स स्कूलला निश्चितच अभिमान व आनंद झाला.

यावेळी या सत्काराला उत्तर देताना विजेता गौरवने सांगितले की, अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत मला संघर्ष करावा लागला. मला या संघर्षाच्या काळात या शाळेतील शिक्षक प्रितम गायकवाड, गोरख लुटे ,रविंद्र गायकवाड,रसाळ सर ,फादर गिलबर्ट,फादर फ्रान्सिस यांनी मोलाची मदत केली‌. मोठा भाऊ वैभवने सतत प्रोत्साहन व समर्थन देऊन उत्साह वाढविला.

गौरवने विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, “सगळेच विद्यार्थी हे प्रथम येऊ शकणार नाही पण आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उतरुन यश मिळवावे. आपले ध्येय व उद्दिष्टे पूर्ण करणे हे आपल्याच हातात असते. शिक्षक हे आपल्याला मार्ग दाखवतात पण पुढील कार्य ,मेहनत ही विद्यार्थ्यांनाच करावी लागते. यासाठी विद्यार्थी वर्गाने नेहमी दक्ष राहून त्या त्या क्षेत्राचा अभ्यास करुन विविध क्षेत्रातील मार्ग निवडून यशस्वी व्हावे”. कार्यक्रमाचे शेवटी आभारप्रदर्शन श्री व-हाडे सर यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments