Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रहिरोजी इंदुलकर फाऊंडेशन, कराड. यांचे वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी ,...

हिरोजी इंदुलकर फाऊंडेशन, कराड. यांचे वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी , महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लोक विकास करण्याचे ध्येय .

मूकनायक:- सातारा जिल्हा कॉर्डिनेटर अॅड. पंडीत गायकवाड
कराड
समजाचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या हिरोजी इंदुलकर फाऊंडेशन या संस्थेने नुकतीच राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली . सदर कार्यक्रमावेळी महिलांचा उस्फूर्त सहभाग होता .
यावेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षी पवार यांनी सस्थेची माहिती देऊन महिलांसाठी करीत आलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. खजिणदार निर्मला पाटील, छाया मोहीते, सुजाता फडतरे आदि महिलांनी जिजाऊंना आदरांजली वाहिली . माता जिजाऊंनी त्या काळात सती न जाता आपल्या मुलाला शिक्षण देऊन स्वराज्य घडविले हीच आपल्या साठी मोठी शिकवण असल्याचे मत यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केले. कर्मकांडाला नकार , विज्ञानवादी शिक्षण आणि महिलांना सन्मान असे अनेक विचार माता जिजाऊंच्या जीवन चरित्रातून घेता येतात असे विविध स्त्रियांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी मीनाक्षी कचरे यांनी जिजाऊंबद्दल उद्बोधक मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मीनाक्षी पवार यांनी भूषविले ,निर्मला पाटील यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments