Thursday, February 26, 2026
Homeपुणे*साहित्यप्रेमी साहित्यिक मंचाचे २८ वे ऑनलाइन काव्य संमेलन संपन्न, ४५ पेक्षा अधिक...

*साहित्यप्रेमी साहित्यिक मंचाचे २८ वे ऑनलाइन काव्य संमेलन संपन्न, ४५ पेक्षा अधिक कवींनी नोंदविला सहभाग..*

मूकनायक प्रतिनिधी:- सचिन मंडाले

साहित्यप्रेमी साहित्यिक मंचाद्वारे ‘नाते आपुलकीचे’ या विषयावर रविवार, दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी २८ वे ऑनलाइन काव्य संमेलन घेण्यात आले.
खुपच छान अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ऑनलाइन काव्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये ४५ पेक्षा जास्त कवींनी पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश या राज्यातून सहभाग नोंदविला. जवळजवळ सर्वच वयोगटातील कवी, कवयित्रींनी एक से एक सरस काव्यरचना यामध्ये सादर केल्या. जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे प्रत्येकाच्या रचना या मनाला साद घालणाऱ्या, आपुलकीच्या नात्याचे महत्त्व सांगणाऱ्या होत्या.
विषन्न होत चाललेल्या मानवी जीवनामध्ये मायेचा ओलावा किती महत्त्वाचा असतो हे या ठिकाणी या काव्य संमेलनाच्या माध्यमातून अधोरेखित झाले.
काव्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद श्री. सुर्यभान खंदारे यांनी भूषविले तर पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यप्रेमी साहित्यिक मंचाचे संस्थापक/ अध्यक्ष श्री. सचिन मंडाले यांनी सांभाळले. तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘मूकनायक’ चे संपादक श्री. तुषार गायकवाड (पुणे) व ‘मुक्तमंथन’ या त्रैमासिकाच्या संपादिका सौ. सुनंदा बोदिले (अमरावती) या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून समर्थ बंडगर (सोलापूर) व राहुल कांबळे (मुंबई) यांनी भूमिका पार पाडल्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments