मूकनायक प्रतिनिधी ; सुनिल एच. गायकवाड (पिंपरी चिंचवड)
दि,09 जानेवारी पिंपरी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक
( भीमसृष्टी ) परिसर याठिकाणी सर्व हारा उत्कर्ष चिंतन सामाजिक संघटनेच्या वतीने माता रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान चेक मिळावेत यामागणी धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज 14 वा दिवस होता. या आंदोलन स्थळावरच ,
राष्ट्रमाता फातिमा शेख ( मुस्लिम समाजाच्या प्रथम शिक्षिका ) यांच्या जयंती निमित्त संघटनेच्या महिला अध्यक्षा मा. सायराबानू शेख यांच्या हस्ते राष्ट्रमाता फातिमा
शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व प्रा. बी बी शिंदे यांनी राष्ट्रमता फातिमा शेख यांच्या विचारावर मार्गदर्शन केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे, व महासचिव दत्तात्रय गायकवाड, व डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष उमेश बनसोडे, संघटनेचे सह संघटक रामभाऊ ओव्हाळ, लिंबराज वाघमोडे, गुलाब गायकवाड, युवराज मस्के, व अमिना शेख इ उपस्थित होते.

