मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं चिं )
दि,04 जानेवारी, पिंपरी : सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना च्या वतीने,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर (भीमश्रूष्टी ) पिंपरी चौक याठिकाणी सुरू असलेल्या, पिंपरी चिंचवड शहरात माता रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थीना मंजूर झालेल्या अनुदानाच्या चेक चे वाटप त्वरित करण्यात यावे यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक दिवस धरणे आंदोलन पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाच्या विरोधात सुरू आहे. या आंदोलनासाठी आज दि 04 जानेवारी रोजी रिपब्लिकन सेना यांच्या वतीने सदरील धरणे आंदोलनास पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी भेट दिली व आंदोलनात सहभागी होऊन सदरील आंदोलनास रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी महासचिव दत्ता भाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष मुकुंद रणदिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

