सांगली दि.०२ : भीमा कोरेगाव शौर्य दिवस जवळ येताच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होतो, याची पुष्टी न करता फॉरवर्ड करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. स्वताला आंबेडकरवादी म्हणणारे सदर या फोटो अथवा पोस्टची पडताळणी देखील करताना दिसत नाही. सदर फोटो भीमा कोरेगाव- सन १८१८ मधील योद्धाची आहे असे खोटे वृत्त प्रसारित करून भीमा कोरेगाव मधील खऱ्या सैनिकांचा न कळत अवमान करत आहेत. यामध्ये काही पुस्तक प्रकाशन करणारे , लेखक देखील शामिल आहेत हे नवलच..
*नेमका हा फोटो आहे तरी कोणाचा* ?
सदर वायरल होणारा फोटो हा केतश्वयो कांपांडे नामक व्यक्तीचा आहे . जो आफ्रिका मधील झुलू राज्याचा राजा होता. त्याचा जन्म १८२६ रोजी झाला. १८७३ पासून ते १८७९ दरम्यान तो झुलू राज्याचा राजा होता. १८७९ रोजी अंग्लो झुलू युद्ध झाले. केतश्वयो कांपांडे याने सातत्याने सदर युद्धाला विरोध केला आणि ब्रिटीशांशी शांतता प्रस्थापित करण्याचा निष्फळ प्रयत्न केला, आणि युद्धात झुलूच्या पराभवानंतर त्याचा पराभव झाला आणि निर्वासित झाला. नंतर त्याला झुलुलँडला परत जाण्याची परवानगी देण्यात आली, जिथे तो १८८४ मध्ये मरण पावला.
अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन प्रमुख अमोल वेटम यांनी दिली. सदर फोटो भीमा कोरेगाव योद्धाचा नाही त्यामुळे अश्या खोट्या पोस्ट फोटो वायरल करणे थांबवावे असे आव्हान देखील त्यांनी केले.

