Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडबहुजन समाज पार्टी च्या वतीने पिंपरीत प्रजासत्ताक दिन साजरा.

बहुजन समाज पार्टी च्या वतीने पिंपरीत प्रजासत्ताक दिन साजरा.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं. चिं.)

दि,27 जानेवारी : बहुजन समाज पार्टी बौध्दनगर शाखा व महाराष्ट्र छावा प्रतिष्ठान च्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिन , दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 09 वाजता पिंपरी येथील बौध्दनगर या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रजासत्ताक दिना निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थित प्राध्यापक युवराज भास्कर, मुख्याध्यापक धाईजे सर, बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष श्रद्धाकेतू सर, तसेच बहुजन समाज पार्टी चे पिंपरी चिंचवड शहर सचिव तथा महाराष्ट्र छावा प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेश ढावरे यांच्या सह श्रावण कोरी, संदीप वाघमारे, अप्पा कांबळे, सुशील गायकवाड, शुभम गायकवाड, अक्षय कांबळे, मिलिंद डोळस यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments