मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिंपरी चिंचवड)
दि,11 जानेवारी पिंपरी ; प्रभाग क्र 19 बौद्धनगर पिंपरी या ठिकाणी अनेक दिवसांपासून नागरी वस्तीमध्ये विदधुत दिव्यांचा एक खांब तुटलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे. तो त्याठिकाना हून त्वरित काढून टाकून त्याच ठिकाणी नवीन खांब बसविण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडी लीगल सेल च्या वतीने मा. सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडी चे शहर संघटक सचिन सोनवणे व लीगल सेल चे अध्यक्ष ऍड सुनिल डोंगरे व
वॉर्ड अध्यक्ष भीम गायकवाड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर वंचित चे भाऊ निकम, मिलिंद मोरे, आनंद वाघमारे, विशाल अंकुटे यांची स्वाक्षरी आहे.
सदरील विद्युत खांब हटवून तात्काळ नवीन बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

