हवेली प्रतिनिधी :रोहन सोनाळे
पिंपरी, पुणे (24 जनवरी, 2022) मूड अच्छा हो तो अच्छे काम सामने आते हैं। पुणे को दुनिया भर में शिक्षा के घर के रूप में जाना जाता है। लोकमान्य तिलक, अगरकर और गोखले के नेतृत्व में पुणे में शैक्षणिक संस्थान रखे गए। अब उनके नाम पर शंकरराव बाजीराव पाटिल उर्फ भाऊ का नाम लेना है। भाई और जनता के नेता शरद पवार ने कभी भी अच्छे तरीके से राजनीति नहीं की। संस्था शिक्षा की ओर अग्रसर है। पूर्व सांसद विदुर नवले ने कहा कि पिंपरी चिंचवड़ विश्वविद्यालय की स्थापना सभी ट्रस्टियों के बीच विश्वास के आधार पर हुई थी.
पिंपरी चिंचवड़ विश्वविद्यालय माननीय का भूमि पूजन समारोह। खाना। विदुर नवले रविवार (23 जनवरी) को सतगांव, मोहितेवाड़ी, तालुका मावल, (पुणे-मुंबई राजमार्ग के पास) जिला पुणे में। सांसद श्रीरंग बार्ने, विधायक सुनील शेल्के, पूर्व विधायक कृष्णरावजी भगड़े, पिंपरी चिंचवाड़ एजुकेशन ट्रस्ट के अध्यक्ष और पूर्व विधायक ज्ञानेश्वर लांडगे। उपाध्यक्ष पदमथाई भोसले, कोषाध्यक्ष शांताराम गैराडे, सचिव विट्ठल कालभोर, ट्रस्टी हर्षवर्धन पाटिल, कार्यकारी निदेशक डॉ. गिरीश देसाई के साथ-साथ वरिष्ठ नेता मौली दाभाडे, चंद्रकांत सत्कर, मावल मधुसूदन बरगे के तहसीलदार, एनएमवीपीएम के संतोष खंडगे, रामदास काकड़े, चंद्रकांत शेटे, नंदकुमार शेलार, भाऊसाहेब करके, सरपंच और सातगांव के उप सरपंच और व्यवसायी राजू म्हस्के, वास्तुकार किरण कालेच और पीसीईटी) और न्यू महाराष्ट्र इंस्टीट्यूट (एनएमआईटी) से संबद्ध सभी स्कूलों और कॉलेजों के प्रधानाध्यापक और प्राचार्य उपस्थित थे।
इस समय, माननीय। खाना। विदुर नवले ने कहा कि भाऊ एक दूरदर्शी व्यक्तित्व थे। उनके नेतृत्व में, कृष्णराव भगड़े, ज्ञानेश्वर लांडगे, विट्ठल कालभोर, पद्मथाई भोसले, शांताराम गैराडे, हर्षवर्धन पाटिल और मुझे पौधे रोपते हुए देखकर खुशी हुई। ये सभी ट्रस्टी सामाजिक रूप से प्रतिबद्ध हैं। मावल वासियों के लिए यह गर्व की बात है कि श्रीरंग बार्ने संसद रत्न पुरस्कार विजेता सांसद हैं। खाना। विदुर नवले ने कहा
माँ कामे ओन। कृष्णराव भगड़े ने कहा कि भारत में शिक्षा के क्षेत्र में जो परिवर्तन हो रहा है। हम इसके गवाह हैं। सभी ट्रस्टी छात्रों के लाभ के लिए इस बदलाव का अधिकतम लाभ उठाने के लिए काम कर रहे हैं। मुझे अपने भाई के साथ विधायक के रूप में काम करने का अवसर मिला। अब मावल पीएमआरडीएम में शामिल हो गए हैं। इस विश्वविद्यालय के माध्यम से निकट भविष्य में एक भव्य शैक्षिक परिसर की स्थापना की जाएगी। आपको प्रतिष्ठित विदेशी विश्वविद्यालयों से भी गुणवत्तापूर्ण शिक्षा मिलेगी। इससे हजारों नए रोजगार भी सृजित होंगे। पिंपरी चिंचवड़ विश्वविद्यालय मावल में होने से मावल की प्रतिष्ठा में इजाफा होगा।
पीसीईटी के अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे ने कहा कि नया विश्वविद्यालय अगले शैक्षणिक वर्ष में विभिन्न विषयों में छात्रों को प्रवेश देना चाहता है। दुनिया भर के 30 से अधिक अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयों के साथ समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए गए हैं। तो इस जगह को उच्च गुणवत्ता वाली शिक्षा मिलेगी। ज्ञानेश्वर लांडेगे ने कहा कि पहले चरण में 10 एकड़ भूमि पर एक शैक्षिक परिसर स्थापित किया जाएगा और जल्द ही इसका विस्तार किया जाएगा।
स्वागत है विट्ठल कालभोर, परिचयात्मक डॉ. गिरीश देसाई और शांताराम गैराडे ने धन्यवाद दिया।
—————————————————————————————————————————————-
पिंपरी,पुणे (दि. २४ जानेवारी २०२२) मनामध्ये भाव चांगला असला की चांगले कार्य उभे राहते. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून जगभर ओळखले जाते. पुण्यात लोकमान्य टिळक, आगरकर आणि गोखले यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संस्थांची पायाभरणी झाली. आता त्यांच्या नंतर शंकरराव बाजीराव पाटील उर्फ भाऊ यांचे नाव घ्यावे लागेल. भाऊ आणि लोकनेते शरद पवार यांनी चांगल्या कामात कधीही राजकारण केले नाही. शिक्षण क्षेत्रात या संस्थेची योग्य वाटचाल सुरु आहे. सर्व विश्वस्तांचे एकमेकांशी असलेल्या विश्वासाच्या नात्यातून निर्माण झालेली हि संस्था म्हणजेच ‘पिंपरी चिंचवड विद्यापीठाची’ स्थापना होय असे प्रतिपादन माजी खासदार विदुरा नवले यांनी केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा भुमिपूजन समारंभ मा. खा. विदुरा नवले यांच्या हस्ते सातेगाव, मोहितेवाडी, तालुका मावळ, (पुणे – मुंबई महामार्गालगत) जिल्हा पुणे येथे रविवारी (दि. २३ जानेवारी) करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी आमदार कृष्णरावजी भेगडे, पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे. उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, एनएमव्हीपीएमचे संतोष खांडगे, रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, नंदकुमार शेलार, भाऊसाहेब कारके, सातेगावचे सरपंच व उपसरपंच आणि उद्योजक राजू म्हस्के, आर्किटेक्ट किरण काळे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट (एनएमआयटी) सी संबंधित सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.
यावेळी मा. खा. विदुरा नवले म्हणाले की, भाऊ हे दुरदृष्टी असलेले द्रष्टे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी आणि कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, पद्माताई भोसले, शांताराम गराडे, हर्षवर्धन पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष होत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे सर्व विश्वस्त सामाजिक बांधिलकी मानणारे आहेत. श्रीरंग बारणे हे संसद रत्न पुरस्कार विजेते खासदार आहेत ही मावळच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे असेही मा. खा. विदुरा नवले म्हणाले
मा. आ. कृष्णरावजी भेगडे म्हणाले कि, भारताच्या शिक्षण क्षेत्रात जी स्थित्यंतरे होत आहे. त्याचे आपण साक्षीदार आहोत. या बदलाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठीच सर्व विश्वस्त काम करीत आहेत. भाऊंबरोबर आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आता मावळचा समावेश पीएमआरडीएमध्ये झाला आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून आगामी काळात भव्य शैक्षणिक संकुल उभे राहिल. तसेच परदेशातील नामवंत विद्यापीठांच्या दर्जाचे शिक्षण येथे मिळेल. तसेच हजारो नविन रोजगार निर्माण होतील. पिंपरी चिंचवड विद्यापीठ मावळमध्ये होणे म्हणजे मावळच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, या नविन विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षात साधारणता: चौदाशे ते पंधराशे विविध शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मानस आहे. जगभरातील तीसहून जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. पहिल्या टप्प्यात दहा एकर जागेत शैक्षणिक संकुल उभारले जाईल लवकरच त्याचा विस्तार करण्यात येईल असेही ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
स्वागत विठ्ठल काळभोर, प्रास्ताविक डॉ. गिरीश देसाई आणि आभार शांताराम गराडे यांनी मानले.

