Thursday, February 26, 2026
Homeदेशसोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त, विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त, विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड ( पिंपरी चिंचवड )

दि.09 डिसेंबर पिंपरी चिंचवड : सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस संलग्न घरेलू महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महा. प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सचिन साठे यांच्या हस्ते आरोग्य व वैद्यकीय विभागातील महिला, घरेलू कामगार महिला, आणि घंटागाडी महिला कामगार यांचा सत्कार करण्यात आला. महा. प्रदेश समन्वयक शीतल कोतवाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हेलिकॉप्टर दुर्घटनेत ठार झालेले सीडीएस बीपीन रावत आणि इतर तेरा जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर काशीबाई तोरड, भारती क्षीरसागर, भामबाई दणके, असरीफुल शेख, कल्पना माने, नंदा कुंजीर, छाया प्रधान, काजल गायकवाड, गंगा लाड आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, जेष्ठ नेते किशोर कळसकर,संदेश नवले, अशोक काळभोर, दिलीप साळवे, मालन गायकवाड, वृषाली गायकवाड, प्रज्ञा कांबळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शीतल कोतवाल, सूत्रसंचालन अझहरभाई पुणेकर व आभार वंदना आराख यांनी मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments