मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पुणे)
दि.14 डिसेंबर : 01 जानेवारी 2022 रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. त्यासाठी भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने या असं आवाहन रिपब्लिकन सेनेचे सर्वे सर्वा मा. आनंदराज आंबेडकर यांच्याकडून नुकतेच सोशीयल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ द्वारे करण्यात आले आहे.
तसेच रिपब्लिकन सेनेतर्फे सकाळी 6 वाजता शौर्य गाथेचा कार्यक्रम होईल असं ही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर भिमा कोरेगाव ची लढाई ही एक ऐतिहासिक पर्व आहे. यामुळेच या देशातील पेशवाई संपुष्टात आली. असं हे युद्ध तुमच्या माझ्या पूर्वजांनी लढलं त्यांची आठवण म्हणून 01 जानेवारी हा शौर्यदिन म्हणून साजरा करत असतो.
तसेच त्यांच्याकडून सरकारला विनंती करण्यात आली की, त्यांनी 6 डिसेंबर प्रमाणे जी. आर काढून आंबेडकरी जनतेला अटकाव करू नये. किंवा अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाज ते एकनार नाही.तरी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी या असं आवाहन आनंदराज आंबेडकर यांच्या कडून करण्यात आलं आहे.

