मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड
दि.02 डिसेंबर, ओमीक्रोन विषाणूच्या धोक्यामुळे राज्य सरकारने महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. याला काही संघटनांनी विरोध केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाता आलं नाही. आता सरकारने सर्व काही सुरू केले असताना केवळ चैत्यभूमीवरच निर्बंध का असा सवाल या संघटनांनी उपस्थित केला आहे. पण आता यावर ऍड .प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सध्या रेल्वे पूर्ण पणे सुरु झालेली नाही, व एसटी चा संप सुरू आहे व सोबतच कोरोनाच्या नव्या विषाणूचा कोणताही अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत आपण चैत्यभूमीवर येणे टाळावे असे आवाहन ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या कडून करण्यात आले आहे. तर आपण जिथ असाल तिथूनच बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया असं म्हटलं आहे.

