मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पुणे )
दि.27 डिसेंबर , भीमा कोरेगाव : दि.01 जानेवारी 2022 रोजी भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या शौर्य दिन अभिवादन कार्यक्रम कामाची पाहणी तथा धावती भेट रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा मा.
आनंदराज आंबेडकर यांच्या कडून विजयस्तंभाची पाहणी करण्यात आली. व त्यांच्याकडून विजस्तंभास अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत भीमा
कोरेगाव विजय रंणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आयु .सर्जेराव भाऊ वाघमारे व रिपब्लिकन विध्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, सचिन कडलक ,कमलेश चाबुकस्वार, दिपंकर इंगोले, दीपक शिंदे, आदी. पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

