*मूकनायक* तालुका प्रतिनिधी:- प्रशांत नरवाडे
ता.कळमनुरी
वंचीत बहुजन आघाडी कडून कळमनुरी बस डेपो मध्ये महामंडळ कर्मचारी यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.पूर्ण महाराष्ट्रभर राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी राज्यशासनाचे कर्मचारी म्हणून घोषित करावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र भर आंदोलन करत आहेत.यामध्ये कळमनुरी तालुक्यातील शहरातील असणारे महामंडळ बस स्टँड येथे देखील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून यांची देखील मागणी आहे. गेली 73 वर्षापासून महाराष्ट्र राज्य लालपरी महामंडळ निर्मिती झाली, जीवाची पर्वा न करता महामंडळ कर्मचार्यांनी दिवस-रात्र जनतेला नागरिकांना सुविधा दिल्यात, महामंडळ कर्मचारी खेड्यातील गोरगरिबांची त्यांच्या सोयीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सुविधापासून पासून वंचित राहावे लागते ही बाब गँभिर आहे.म्हणून मागणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी यांनी केलेल्या मागण्या हा रीतसर योग्य असून वंचित बहुजन आघाडी कळमनुरीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येतो व त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना देऊन पक्षीय मोठे आंदोलन करण्यात येईल याची दखल शासन व प्रशासनाने घ्यावी अशे आगर प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी,
राजू कांबळे (ता.महासचिव,वंचित ब आ,कळमनुरी),शेख अफजलभाई (ता.सहसंघटक,कळमनुरी),युवा शेख सलमान भाई),युवा असिफभाई पठाण व इतर पदाधिकारी

