*बावने पांगरी येथील विशाल धम्म परिषदेत राजरत्न आंबेडकर यांचे आवाहन**
*जालना (प्रतिनिधी) ः* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म दिक्षा देऊन आम्हाला खुप मोठे व्यासपीठ दिले आहे. त्या धम्मामुळे आम्हाला सन्मान आणि अभिमानाने जगण्याची संधी मिळाली. परंतु राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या आमच्या अधिकाराला हीरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि वेळीच सावध व्हा, राजकीय झेंडा हाती घेण्यापेक्षा धम्माचा ध्वज हाती घ्या असे आवाहन दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाचे तथा भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.
बावने पांगरी ता. बदनापुर येथे दि. 29 ऑक्टोंबर 2021 रोजी विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होेते, या धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिख्खू संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पू. भन्ते करुणानंद थेरो हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशीकांत जाधव, वरीष्ठ पदाधीकारी दिनेश हनुमंते, वैभव धबडगे, कमांडर बाजीराव सोणवने, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे, अनंता मिसाळ यांची उपस्थिती होती. यावेळी स्वगताध्यक्ष गौतम बोर्डे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. यावेळी धम्म परिषदेस धम्मदेसना देण्यासाठी पू. भन्ते एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, पू. भन्ते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, पू. भन्ते मनायु, पू. भन्ते राजरत्न, पू. भन्ते रेवत, पू. भन्ते शिलानंद, पू. भिख्खूनी प्रज्ञाशिला यांची उपस्थिती होती. यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना देऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी बोलतांना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला चांगले आणि सक्षम असे संविधान दिले आहे. या संविधानाचा गुणगौरव देश-विदेशात होत आहे. परंतु आपल्याच देशात देशाच्या पंतप्रधानासमोर संविधान जाळून त्याचा अपमान करतात, तरीही देशाचे पंतप्रधान शांत बसतात ही शोकांतीका आहे. संविधानाला कुचकामी करण्याचे काम राजकीय लोक करीत आहेत. संविधान कीतीही चांगले असले, तरही ते संविधान चालवणारे योग्य नसतील, लायक नसतील तर ते संविधान काही कामात येणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. आणि आज तुम्ही आम्ही ते अणुभवत आहोत. असेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्दमय भारत करण्यासाठी सुरु केलेला संघर्ष आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाची स्थापना केली असून त्याचे काम आजपर्यंत अविरत सुरु आहे. या संस्थेच्या माध्यमातून सदस्य होवून बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेटाने घेऊन जाण्याचे काम करावे असे आवाहन देखील राजरत्न आंबेडकर यांनी केले. या विशाल धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी बावने पांगरी येथी सर्व उपासक व जिल्हा कार्यकारीणीतील माधूरी मोरे, राजेंद्र अंभोरे, संजय हेरकर, आशा दवंडे, दिनकर गरड, भास्कर घेवंदे, दत्तात्रय सरोदे, राजकुमार दांडगे, राहुल भदर्गे, किरण सोणवने, राजु खरात, सखाराम साबळे, नितीन निसर्गन, चंद्रमुणी गाडेकर, जी. एस. गाडेकर यांनी परिश्रम घेतले.यावेळी अरूण सुर्वे यांनी सुञसंचलन केले.
प्रेमानंद मगरे
|
ReplyForward
|

