मूकनायक तालुका प्रतिनिधी:-प्रशांत नरवाडे
कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत अनेक प्राथमिक केंद्रे आहेत ज्यामध्ये गरज नसताना नियमाबाह्य जाऊन औषध निर्माण कर्मचाऱ्यांच्या गट विकास अधिकारी यांनी संगमत करून नियमाबाह्य बेकायदेशीर रित्या बदल्या करण्यात आल्या असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद CO यांच्या कडे करण्यात आली आहे. यामध्ये अनेकवेळा सामाजिक कार्यक्रत्यांकडून देखील तक्रारी करण्यात आल्या असून त्यावर गट विकास अधिकारी यांनी काहीही उत्तर दिले नसून उडवाउडवी करत असून आता याचा खुलासा जोर्यंत पंचायत समिती करत नाही व दोषींवर कारवाई करत नाही अशी मागणी करत येत्या 15 दिवसात चौकशी न कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद हिंगोली येथे उपोषणाचा इशारा वंचित बहुजन आघाडी कळमनुरी च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी वंचितच संघरत्न डोंगरे (ता.प्रवक्ता,कळमनुरी),
चंद्रमुनी मोगले (ता.सद्यस्य, कळमनुरी),
संजय डोंगरे सर (ता.सद्यस्य, कळमनुरी),सुरज इंगोले यांनी मागणी केली आहे

