मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच.गायकवाड ( पिंपरी चिंचवड )
असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस च्या वतीने अभिवादन.
दि.28 नोव्हेंबर, पिंपरी: क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस च्या वतीने पिंपरी येथील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड व शितल कोतवाल समन्वयक महा. प्रदेश घरेलू महिला कामगार कर्मचारी काँग्रेस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दिलीप साळवे शहराध्यक्ष ऑटोरिक्षा संघटना, वंदना आराख सचिव, सुरेखाताई, भारती क्षीरसागर, वृषाली कदम, राजेश गायकवाड, पत्रकार भानुदास गायकवाड ई पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

