Thursday, February 26, 2026
Homeदेश*अदनान सामीला चौथा भारतीय नागरी सन्मान असणारा पद्मश्री मिळाला!* {अदनानं हा सन्मान...

*अदनान सामीला चौथा भारतीय नागरी सन्मान असणारा पद्मश्री मिळाला!* {अदनानं हा सन्मान आपल्या वडलांना अर्पण केलाय }}

भारतीय एअरबेस नेस्तनाबूत करणाऱ्या एका पाकिस्तानी पायलटच्या 5 वर्षांपूर्वी भारतीय झालेल्या मुलाला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालाय!
अदनान सामीचे वडील अर्शद सामी खानला सीतारा ए जुरात हा तिसरा सर्वोच्च पाकिस्तानी लष्करी अवॉर्ड मिळाला होता.
१९६५ च्या युद्धात भारतीय एअरबेस पठाणकोठ उद्ध्वस्त करणाऱ्या स्क्वार्ड्रनचं अदनानच्या वडिलांनी नेतृत्व केल होतं.
भारताविरोधी हवाई कारवायांमध्ये सर्वात जास्त सहभागी असणारा पायलट म्हणून पाकिस्तानच्या इतिहासात अर्शद सामीला स्थान आहे!
अर्शद सामी खाननं तीन पाकिस्तानी पंतप्रधानांचा सहाय्यक म्हणून काम केलंय, पायलट आणि पाकिस्तानी डिप्लोमॅट म्हणून त्याची ओळख होती
अदनान सामीला २०१६ साली भारतीय नागरिकत्व मिळालं आणि २०२१ साली चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार मिळालाय!
पद्मश्री का मिळाला हा मुद्दा थोडा बाजुला ठेवू पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की कोणत्याच विरोधी पक्षाला हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही! आता भाजपऐवजी काँग्रेस सरकार असतं तर? भाजपनं किती रान पेटवलं असतं..? कदाचित कोणत्याच विरोधी पक्षांना हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नसावा पण इतर पेट्रोल-डिझेल-महागाई वगैरे मुद्द्यांवर तरी त्यांची विरोधक म्हणून कामगिरी समाधानकारक आहे का? असोत…सोनु सूद पेक्षा कदाचित चांगल काम असेल किंवा चांगली समाज सेवा केली असेल असा जावई शोध लावून अदनानला पद्मश्री मिळाला याबाबत मी अज्ञानी आहे, कृपया प्रबोधन करा! अदनानला पद्मश्री मिळणं माझ्या भाजपच्या मित्रांना तरी पटतंय का?!
— प्रणय सोहमप्रभा, नागपू
- Advertisment -

Most Popular

Recent Comments