● मूकनायक : चांदू मोरे
महागांव (यवतमाळ) :– लोकांनी लोकांचे आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी शासनाने बॅंकेची स्थापना केली आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या बॅंकांवर पारदर्शक आर्थिक नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा जिल्हा स्तरावर जिल्हा अग्रणी बँक व राष्ट्रीय स्तरावर रिजर्व्ह बॅंकेची निर्मिती झाली असुन राष्ट्रीय पातळीवरील अर्थतज्ज्ञांच्या देखरेखीखाली सर्व स्तरातील बॅंकेची स्वयंचलीत कार्यप्रणाली कार्यरत असते. एखादे वेळी नजरचुकीने मानवी हस्तक्षेपामुळे काही त्रुटी आढळल्यास बॅंकेची स्वयंचलीत प्रणाली अधिकारी कर्मचार्यांना माफी देवू शकत नाही. अर्थातच बॅॅंक क्षणोक्षणी ग्राहकांची जबाबदारी स्विकारते. त्यामुळे इतर बाहय घटकांना शंका घेण्यास कोणताही वाव नसतो. तात्पर्य असे की, वरिष्ठ पातळीवरील नियमांच्या अधिन राहुन बॅंकेला ठरवून दिलेले उद्दीष्ट पुर्ण करावेच लागते.
सदर्हू बाबतीत महागांव येथील युनियन बॅंक ऑफ इंडिया ही तशी काळी (दौ.) ची शाखा असुन ती कार्यक्षम पध्दतीने शेतकर्यांच्या आर्थिक हितासाठी काम करणारी अग्रेसर बॅंक म्हणून वरदान ठरली आहे. या बॅंकेने शासनाने अथवा रिजर्व बॅंकेने ठरवून दिलेले पिककर्जाचे जुने आणि नवीन उद्दिष्ट पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल केली आहे. अधिकारी, कर्मचारी असा एकूण सात लोकांचा स्टाफ आहे तो पुरेसा आहे. व्यवस्थापकांच्या पारदर्शक नियमाप्रमाणे कर्मचार्यांना कामे करावी लागतात. त्यामुळे बाहेरील कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही. सध्या २०२०-२१ या चालु आर्थिक वर्षात एकुण १,५०० शेतकरी खातेदार पिककर्जाचे उद्दिष्ट होते त्यापैकी जुने आणि नवीन अशा एकूण १,७९५ शेतकरी खातेदारांना बॅंकेने पिककर्जाचे वाटप केल्याचे व्यवस्थापक श्रीकांत बांबळे म्हणाले. जे की, ११७.७८% इतकी सरासरी टक्केवारी असुन १३.९ करोड एकूण वाटप रक्कम अदा केली आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी बॅंकेपुढील कास्तकारांना विचारणा केली असता, शेतकर्यांनी बॅंकेची कार्यपध्दती व सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले. एकंदरीत इतरांपेक्षा युनियन बॅंकेची कार्यपध्दती वेगवान व सुलभ असल्याचे शेतकर्यांकडून बोलले जात आहे.
|
ReplyForward
|

