Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्यापिरवाड समुद्रकिनारी साफसफाई

पिरवाड समुद्रकिनारी साफसफाई

उरण दि 13(मुकनायक प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे )पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातून सेव अवर बीच व क्रिएट टुगेदर फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उरण पिरवाडी समुद्र किनारी साफसफाई करण्यात आली.यावेळी समुद्रातून वाहून आलेला नैसर्गिक कचरा, समुद्रकिनारी फिरायला आलेले पर्यटक यांनी टाकलेले प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, विविध कागदी प्लास्टिक वस्तू आदी एकत्र गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सेव अवर बिचचे अमोल दुरुगकर, आर्यन घरत, भूमिका सिंग, शिवा म्हात्रे तसेच क्रीऍट टूगेदर फॉउंडेशनचे दीपक विश्वकर्मा, रवी वर्मा, अभिषेक गुप्ता, असमान शेख, शोभना पिल्लई, शक्ती पिल्लई, हमीद शेख, प्राची फडके, सौरभ आदी सेव अवर बीच व क्रिएट टुगेदर फॉउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.स्वयंम स्फूर्तीने तरुणांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विविध सामाजिक संस्था, संघटनांनी कौतुक केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments